Shikshan Saptah
आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोगर्दा येथे शिक्षण सप्ताह या देशव्यापी उपक्रमांतर्गत अध्ययन अध्यापन साहित्य दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मुखवटे , story cards, फळे भाज्या यांचे cards, माझे कुटुंब अन्न व भाजीपाला यावर आधारित तक्ते स्वतः तयार केलेत. तसेच वाचन क्लब ची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी वाचन कट्ट्यावर विविध अवांतर पुस्तकांचे वाचन केले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींनी लोकसंगीत अंतर्गत आदिवासी नृत्य सादर केले. तसेच गोष्टीचा कट्टा छान रंगला. 🙂👍 https://photos.app.goo.gl/DmNt7B6bZGQYWJUq6 *जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोगर्दा येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत दिवस दुसरा... मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता (FLN Day)साजरा करण्यात आला.* *या अंतर्गत परिपाठामध्ये शिक्षक व विद्यार्थी यांनी निपुण प्रतिज्ञा घेतली . त्यानंतर रांगोळीच्या सहाय्याने गणितातील अंक , भौमितिक आकृत्या , अक्षरे याचा वापर करत सजावट करण्यात आली. ग्रंथालयातील अवांतर वाचनाची पुस्तके स्तरनिहाय व वर्गनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात आली आणि घड्याळी एक तास वाचन घेण्यात आले . तसेच शासनाकडून पुरविण्यात आल